By  
on  

म्हणून पुष्कर श्रोत्रीला झाला खुप आनंद, जाणून घ्या

सध्या देशासह राज्यात करोनाचं थैमान सुरु आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होतेय. आरोग्य यंत्रणेवर याचा प्रचंड ताण येतोय. सरकार करोनाला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. अशातच गरजू रुग्णांसाठी रक्तदान करण्याचंं आवाहन मोठ्या प्रमाणावर  केलं जातंय. अनेक सेलिब्रिटीही रक्तदान करतायत. 

मराठीतील प्रसिध्द अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट निवेदक पुष्कर श्रोत्रीनेही नुकतंच रक्तदान केलं . पण यावेळी रक्तदान करताना पुष्करला प्रचंड आनंद झाला होता. याचं कारणंही खास होतं. कारण, यावेळेस त्याची लेक शनायाने पहिल्यांदा आयुष्यात रक्तदान केलं. याचा पुष्करला प्रचंड आनंद तर झालाच पण खुप अभिमानंही वाटला. तसंच यासोबतच पुष्करच्या लेकीने वर्षातून दोनदा रक्तदान करण्याचा संकल्प केल्याने बाबा प्रचंड खुश झाला आहे. 

 

 

 

पुष्करच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive