By  
on  

Birthday Special : पाहा पाठकबाई फेम अभिनेत्री अक्षया देवधरच्या साडीतील दिलखेचक अदा

 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईंची लय भारी  लव्हस्टोरी सर्वांनाच भावली. या मालिकेमुळे पाठकबाई फेम अभिनेत्री अक्षया देवधरचासुध्दा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि अपलातून अदाकारीने अक्षयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. 

 मालिका ऑफ एअर गेल्यानंतर 'अंजली बाई' अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मिडीयावर विविध फोटोशूट आणि व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. 

अक्षयाच्या साडीतील फोटोशूटला चाहत्यांची खास पसंती मिळते. 

सध्या अक्षया आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष देतेय. याबाबत ती चाहत्यांना नेहमीच अपडेट ठेवते. 

गेली चार वर्षे  'तुझ्यात जीव रंगला'  रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 

चाहते आता जरी पाठकबाईंना मिस करत असले तरी अक्षयाचं विविध फोटोशूट्स चाहत्यांसाठी पर्वणी ठरतात. 

 

​​​​​​​

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive