सोशल मिडीयावर अनेक कलाकार सक्रीय असतात. आपले नानाविविध फोटोशूट , व्हिडीओ यासोबतच आठवणींचा खजिनासुध्दा चाहत्यांशी शेअर करतात. अलिकडेच मराठी सिनेसृष्टीतील एका सशक्त अभिनेत्रीने आपल्या बालपणीचा आईसोबतचा गोड फोटो शेअर केला आहे. त्याला आई असं कॅप्शनही दिलंय. निमित्त होतं ते मदर्स डेचं .
ही मराठी अभिनेत्री हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवतेय. तसंच तिची आईसुध्दा एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. तुम्ही आत्तापर्यंत ओळकलंच असेल ही गोड चिमुकली म्हणजेच अभिनेत्री अमृता सुभाष व तिची आई अभिनेत्री ज्योती सुभाष.
मायलेकींच्या या गोड फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. अमृता नेहमीच विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
अमृताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं रितसर शिक्षण घेतलं आहे. अमृताचे पती अभिनेते संदेश कुलकर्णी हेसुध्दा उत्तम अभिनेते आहेत. अनेक मराठी सिनेमे, हिंदी सिनेमे, वेबसिरीज आदींमधून अमृताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. तिला आजवर अनेक नामांकिंत पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.
2019 साली प्रदर्शित झालेल्या गली बॉय सिनेमासाठी अमृतालाा सर्वौत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.