By  
on  

रिंकू राजगुरुने आमीर खानसोबतची ही आठवण केली शेअर

रिंकू राजगुरु सध्या कागरच्या कौतुकाची मजा घेत आहे. कागरमधील तिच्या दमदार परफॉर्मन्सची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी मॅक्स प्लेअरवरील ‘फेमसली फिल्मफेअर’ या चॅटशोमध्येही रिंकूने हजेरी लावली होती. त्यावेळी आमीर खानसोबतची एक आठवण रिंकूने शेअर केली आहे. आमीरने रिंकूला एकदा आर्ची अशी हाक मारली होती. ही आठवण शेअर करताना रिंकू म्हणते, आमीरने हाक मारल्यावर मला काय बोलावं हे सुचलंच नाही. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलंच याशिवाय बहुमोल सल्लाही दिला. ते म्हणाले, काम मन लावून करा. यशाने हुरळून जाऊ नका. एका छोट्याश्या गावातून आल्याने तुमच्या कामगिरीकडे प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. त्यामुळे खुप प्रामाणिकपणे काम कर. या कार्यक्रमात रिंकूने सैराटच्या अनेक आठवणी शेअर केल्या.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive