By  
on  

रवी जाधव दिग्दर्शित ढिंच्याक 'रंपाट'चा हा धमाकेदार ट्रेलर तुम्ही पाहायलाच हवा

रवी जाधव यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ढिंच्याक 'रंपाट'चा ट्रेलर आज अखेर उलगडला. अभिनय बेर्डे आणि कश्मिरा परदेशी ही फ्रेश जोडी या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच उलगडला. ग्रामीण पार्श्वभूमी, ऐन तारुण्यातील डोळ्यात असंख्य स्वप्न आणि त्या स्वप्नांसाठी गाठलेली मायानगरी मुंबई, अशी ही सिनेमाची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळाली.

गावात राहून हिरो बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेला मिथून तर कोल्हापुरच्या कुस्तीपटूची मुलगी मु्न्नी हिलासुध्दा सिनेमात हिरोईन म्हणूनच चमकायचं असते. दोघांचीही दिशा एकच असते आणि यासाठी एकमेव पर्याय ठरतो ती म्हणजे मुंबई. दोघंही मुंबईला आपल्या स्वप्नांचा मागोवा घेण्यासाठी पळून येतात, तेव्हा नेमकं काय घडतं ही सर्व धम्माल अनुभवण्यासाठी आपल्याला सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागेल.

विशेष म्हणजे यात अभिनय आणि कश्मिराही अनेक खास लूक पाहायला मिळतो आहे. हा सिनेमा १७ मे २०१९ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

पाहा ट्रेलर 

https://youtu.be/nFYHpWNwzGk

Author

Recommended

PeepingMoon Exclusive