नातेवाईक असूनही या मराठी अभिनेत्रीची वृद्धापकाळात दुर्दशा

By  
on  

पन्नासच्या दशकात अनेक सिनेमात झळकलेल्या अभिनेत्री चित्रा नवाथे यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नातेवाईक असूनही चित्रा यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार चित्रा सध्या मुलूंडमधील वृद्धाश्रमात आहेत. चित्रा यांना स्मृतिभ्रंश होतो आहे. चित्रा यांनी लाखाची गोष्ट, वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, बोलवता धनी अशा सिनेमात काम केलं आहे. 

त्यांचं मुळ नाव कुसुम सुखटणकर. गदिमा. नी त्यांचं नाव बदलून चित्रा ठेवलं. चित्रा यांनी ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबंब’ या चित्रपटात काम केले. ‘टिंग्या’ हा चित्रपट त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी केला. दिग्दर्शक मीना नाईक या चित्रा यांना घरी नेण्यासाठी प्रयत्शील असल्याचं समोर येत आहे.

Recommended

Loading...
Share