'मुलगी झाली हो' मालिकेतील हा अभिनेता आहे या प्रसिध्द कलाकाराचा मुलगा

By  
on  

मराठी मनोरंजनविश्वातील अनेक प्रतिभावंत कलाकार आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलंही या क्षेत्रात पाय रोवू पाहतायत. अनेक मराठी मालिका सध्या रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतायत. त्यापैकीच स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो ही मालिका आहे.  ह्या कौटुंबिक मालिकेने अल्पावधितच रसिकांची मनं जिंकली आहेत. 

या मालिकेत विलासचा मुलगा आणि माऊच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल तुम्हाला हे माहितीय का,मालिकेत माऊचा भाऊ म्हणजेच रोहन पाटीलची भूमिका साकारली आहे अभिनेता “सृजन देशपांडे” ह्याने. मालिकेतला रोहन काही दिवसांपूर्वीच आर्यासोबत विवाहबद्ध झाला होता. ह्या विवाहाची बरीच चर्चा रंगली. 

ही भूमिका जरी नकारात्मकतेकडे झुकणारी असली  तरी त्याच्या सहजसुंदर अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सृजन बद्दल राजकीय व्यक्तिमत्व आणि शिक्षणप्रेमी चंद्रकांत देशपांडे यांचा नातू आहे एवढेच नाही तर प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता “राजेश देशपांडे” यांचा तो मुलगा आहे

Recommended

Loading...
Share