By  
on  

अभिनेता सिध्दार्थ चांदेकरच्या 'त्या' पोस्ट मागचा नेमका अर्थ काय?

मराठी इंडस्ट्रीमधला चॉकलेट हिरो सिद्धार्थ चांदेकर याच्या कारकिर्दीची घोडदौड सध्या मालिका आणि वेबसिरीज मधून जोरात सुरु आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही त्याची वेबसिरीज अल्पावधीत लोकप्रिय झाली. तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’ मालिकेमधून सिद्धार्थने स्वतःच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. स्टार प्रवाहवरील सध्या सुरु असलेल्या ‘जिवलगा’ या मालिकेच्या माध्यमातून सिद्धार्थ चांदेकर खूप काळानंतर टीव्ही माध्यमात परतला. आणि ही मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

कारकीर्द ऐन भरात असताना सिद्धार्थ चांदेकर याने इंस्टाग्रामवर नवीन पोस्ट टाकून सर्वांना चकीत केले आहे. ‘१८ महिन्यानंतर पुन्हा भेटू. पूर्णपणे नवीन माध्यमात स्वतः ला आजमावण्याचा प्रयत्न करत आहे, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ला आणि ‘जिवलगा’ला  दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार’, या आशयाची पोस्ट सिद्धार्थने इंस्टाग्रामवर केली आहे.

सिद्धार्थ लंडन येथे गेला असून तो तिथे नक्की कशासाठी गेला आहे याचं कारण अद्यापी कळू शकलेल नाही. तो तिथे शिकण्यासाठी गेला आहे अथवा त्याला एखादा नवीन प्रोजेक्ट मिळाला असण्याची चर्चा मराठी सिनेवर्तुळात घडत आहे. यामागील नेमक कारण  सिद्धार्थच सांगू शकेल. त्यासाठी  त्याच्या नवीन पोस्टची त्याच्या चाहत्यांना वाट पाहावी लागेल.

https://www.instagram.com/p/BxEYPgMgDT-/

Recommended

PeepingMoon Exclusive