By  
on  

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक'चं पुणे शेड्यूल पूर्ण

मालिका आणि चित्रपट माध्यमात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. अभिनयासोबतच मृण्मयीने २०१५ साली 'अनुराग' हा सिनेमा दिग्दर्शित केला. नुकताच तिची प्रमुख भूमिका असलेला '१५ ऑगस्ट' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता राहुल पेठे आणि मृण्मयी देशपांडे ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

आता '१५ ऑगस्ट' नंतर पुन्हा एकदा ही जोडी 'मनाचे श्लोक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटाच दिग्दर्शन स्वतः मृण्मयी देशपांडे करत आहे. 'अनुराग' नंतर दिग्दर्शक म्हणून मृण्मयीचा हा दुसरा चित्रपट असणार आहे.

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक'चं पुणे शेड्यूल नुकतंच पूर्ण झालं असून लवकरच ह्याच्या पुढील शेड्यूलला सुरुवात होईल. श्रेयस जाधव आणि संजय दावरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमात मृण्मयी एका ट्रॅव्हल ब्लॉगरच्या भूमिकेत पाहायला मिळणार असून राहुल पेठेची व्यक्तिरेखा अद्याप गुलदस्त्यात आहे.

 

https://www.instagram.com/p/BxHPhxQhYV4/?utm_source=ig_web_copy_link

Author

Recommended

PeepingMoon Exclusive