राम गणेश गडकरी लिखित 'एकच प्याला' हे नाटक आजही मराठी रंगभूमीवरचं गाजलेलं नाटक आहे. हे नाटक अजूनही प्रेक्षकांच्या मनात आदराचं स्थान मिळवून आहे. १०० वर्षांनंतर पुन्हा एकदा हे नाटक नव्याने रंगभूमीवर येत आहे. स्व. विद्याधर गोखले यांनी स्थापन केलेल्या 'रंगशारदा प्रतिष्ठान' या नाट्यसंस्थेतर्फे एकाच प्याला नाटकाची नवीन रंगावृत्ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
विजय गोखले यांनी या नाटकाचं नव्या रंगावृतीत रूपांतर केल असून नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा ते सांभाळत आहेत. तसेच प्रदीप मुळये हे नेपथ्य आणि प्रकाशयोजना करत आहेत. तर अभिनेता अंशुमन विचारे आणि संग्राम समेळ यांची या नाटकात प्रमुख भूमिका आहे. नाट्यवर्तुळात या नाटकाची चर्चा असून हे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होणार असून सर्वांनाच हे नाटक पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
https://twitter.com/AnshumanVichare/status/1125275783864377344