मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून तिने सर्वोत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर स्थान मिळवलं. सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून स्थान मिळवणं व ते टिकवून ठेवणं हा प्रवास सोनालीसाठी अजिबातच सोप्पा नव्हता. जिद्द, चिकाटी आणि मेहनत यामुळेच ती आज यशोशिखरावर पोहचली.
अलिकडेच सोनालीला हिरकणी या तिच्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मराठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. आज 18 मे सोनालीचा वाढदिवस . यानिमित्ताने सोनालीच्या सिनेकारकिर्दीवर एक नजर.
सोनाली आणि तिचं कुटुंब पुण्यात निगडी येथे स्थायिक आहेत. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलात कार्यरत होते. ३० वर्षे तिथे सेवा केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले आहेत. तर तिची आई सविंदर ही पंजाबी आहे.
महत्त्वाचं म्हणजे सोनालीने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता केली आहे.
सोनालीचा भाऊ अतुलसुध्दा मॉडेलिंग आणि सिनेविश्वातच कार्यरत आहे.
सोनालीने केदार शिंदे दिग्दर्शित बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.
रवी जाधव दिग्दर्शित नटरंग सिनेमातील अप्सरा आली या लावणीवर सोनाली जबरदस्त थिरकली आणि महाराष्ट्राची अप्सरा झाली.
2014 साली स्वप्निल जोशी आणि प्रार्थना बेहरेसोबत सोनालीने स्क्रीन शेअर केलेला मितवा हा सिनेमा सुपरहिट ठरला.
यानंतर सोनालीने क्षणभर विश्रांती, हाय काय नाय काय, स सासूचा, अजिंठा, झपाटलेला -२, पोस्टर गर्ल, क्लासमेट, हंपी शटर यांसारखे अनेक सिनेमे केले.
ग्रॅंड मस्ती या हिंदी सिनेमातून सोनालीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रितेश देशमुखसोबत ती झळकली होती.
पण अलिकडेच सोनालीने एका कार्यक्रमात आपण यापुढे हिंदीत काम करणार नसल्याची मोठी घोषणा केली.
सोनालीचा हिरकणी हा ऐतिहासिक कथेवर आधारलेला सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला.
लवकरच सोनाली छत्रपती ताराराणी या ऐतिहासिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
तसंच तिचे झिम्मा आणि फ्रेश लाईम सोडा हे आगामी सिनेमेसुध्दा लवकरच प्रदर्शित होतील.
सोनाली लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिने फियान्से कुणाल बेनोडेकरसह मागच्यावर्षी फेब्रुवारीत साखरपुडा केला. हा साखरपुडा दुबईत पार पडला.