By  
on  

अखेर उलगडलाच अभिनेता सिध्दार्थ चांदेकरच्या 'त्या' पोस्टचा अर्थ

सध्या अनेक सेलिब्रिटी सोशल माध्यमाच्या मदतीने अनेक गोष्टी पोस्ट करतात आणि चाहत्यांना बुचकळ्यात टाकतात. काल अशीच एक चक्रावून टाकणारी पोस्ट अभिनेता सिध्दार्थ चांदेकरने केली होती आणि अखेर त्याचाच उलगडा त्याने आजच्या पोस्टमध्ये केला. आपण 18 महिन्यांसाठी लंडनला जात असल्याची पोस्ट केली. पुन्हा भेटू असं म्हटलं होतं. पण खरं तर त्याने आजच्या पोस्टमध्ये आपला आगामी सिनेमा 'मिस यू मिस्टर' निमित्त चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी लंडनला जाण्याची पोस्ट केली होती.

'मिस यू मिस्टर' या सिनेमात सिध्दार्थ चांदेकरसोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे झळकणार ाहे. ब-याच काळानंतर ही सुपरहिट जोडी या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येत असून येत्या 21 जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक सिनेमा असून तो नातेसंबंधांवर बेतलेला आहे. या सिनेमात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसेसविता प्रभूणेअविनाश नारकरराधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे.

सिनेमाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली की 'मिस यू मिस्टर'चे लेखक आणि दिग्दर्शक समीर जोशी यांच्याबरोबरचा हा माझा दूसरा सिनेमा असून या आधी मी त्याच्या 'मामाच्या गावाला जाऊयाया सिनेमामध्ये काम केले होते. 'मिस यू मिस्टर'मध्ये मी 'कावेरीनावच्या मुलीची भूमिका साकारत आहेसध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते’.

मिस यू मिस्टर’ या  सिनेमाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला की ‘मृण्मयी आणि मी कॉलेजमध्ये असताना एकांकिकांमध्ये काम केले आहे. मृण्मयी देशपांडे ही खूप चांगली अभिनेत्री असल्यामुळे मलादेखील सिनेमामध्ये तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूणनावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे’.

https://www.instagram.com/p/BxJk8xvA5hL/?utm_source=ig_web_copy_link

मिस यू मिस्टरचे दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, “ही काही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाहीतर कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एकमेकांवर अतीव प्रेम असणाऱ्यांना एकमेकांपासून दूर रहायची वेळ आली तर ते अंतर फक्त शारीरिक नाहीपण त्यामुळे नात्यामध्ये अंतर पडतंआणि जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावंया सर्वांबद्दल हसत-खेळत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive