‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फास्टर फेणे’, ‘अमर फोटो स्टुडिओ’ अशा विविध माध्यमांतून अभिनेता अमेय वाघने स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडियावरील मिश्कील पोस्ट मधून तो नेहमी चर्चेत असतो. अमेयने नुकत्याच टाकलेल्या एका पोस्टमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अमेय वाघने 'मला मदत हवीय तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज!' अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. ही पोस्ट टाकताक्षणी अमेयवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा आंणि शुभेच्छांचा वर्षाव झाला. खूप जणांनी अमेयच्या मुलीसाठी नाव सुचवलं आहे. यात मराठी इंडस्ट्री मधल्या अनेक कलाकारांचा सुद्धा सहभाग आहे. २०१७ साली अमेय वाघ साजिरी देशपांडेसोबत विवाहबंधनात अडकला गेला. त्यामुळे अमेयच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण कहानी में ट्विस्ट कुछ और ही है .
https://www.instagram.com/p/BxHiqV0ByWq/
परंतु त्याचबरोबर अमेय वाघची ही पोस्ट आगामी कोणत्यातरी चित्रपटाचं प्रमोशन असू शकत ही चर्चा सुद्धा सिनेवर्तुळात सुरु आहे. यापूर्वी अमेयने अभिनेत्री मिथिला पालकर सोबत एक फोटो पोस्ट केल्याने अमेय आणि मिथिला हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याची चर्चा झाली होती. परंतु नंतर तो फोटो ‘मुरांबा’ चित्रपटाचं प्रोमोशन करण्यासाठी अमेयने वापरला होता. त्यामुळे ही पोस्ट सुद्धा अमेयने आगामी चित्रपटाचं प्रोमोशन करण्यासाठी वापरली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.