लग्न म्हणजे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. या क्षणासाठी आपण अनेक स्वप्नं रंगवतो. मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या आयुष्यातसुध्दा हा खास क्षण आला.
दुबईत 7 मे रोजी सोनालीचा विवाहसोहळा पार पडला.
प्रियकर कुणाल बेनोडेकरसह सोनाली विवाहबंधनात अडकली.
मोजक्या चार लोकांच्या उपस्थितीत दुबईतील हिंदू मंदिरात हा विवाह सोहळा संपन्न झाला
सोनालीच्या परिवाराने या सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचंही तिने शेअर केलेल्या फोटोंमधून दिसत आहे.
शब्दश: चार लोकांच्या उपस्थितीत ्अप्सरेने लग्नगाठ बांधली
अब हम 7 मे म्हणत तिने ही बातमी शेअर केली आहे. मागील वर्षी 2-2-2020 मध्ये या जोडीचा साखरपुडा पार पडला होता. तेव्हापासून चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता होती.