By  
on  

'दुबईतला 2 बीएचके फ्लॅटच माझा राजमहाल, पण राहतोय सुखी-समाधानी': सोनाली कुलकर्णी

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ९ मे रोजी प्रियकर कुणाल बेनोडेकरसह लग्नगाठ बांधली. दुबईतील हिंदू मंदिरात अगदी साध्या पध्दतीने सोनालीने लग्न केलं. वाढदिवशी म्हणजेच १८ मे रोजी ही गोड बातमी चाहत्यांना देत सोनालीने सुखद धक्काच दिला. खरंतर साग्रसंगीत लग्न करण्याच्या विचारात असलेल्या सोनालीने लॉकडाऊन आणि सध्य परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेता मोजक्या चार लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. या लग्नसोहळ्यासाठी सोनालीचे घरचे आणि कुणालच्या घरचेसुध्दा ऑनलाईनच हजर होते.

सोशल मिडीयावर सोनालीच्या या दुबईतील लग्नसोहळ्याची बरीच चर्चा रंगली होती. अनेकांनी तिने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं. पण अशातच सोनाली व कुणालच्या दुबईतील घराबद्दल अनेक माध्यमांतून बातम्या झळकल्या. सोनालीचं दुबईतील घर राजमहाल किंवा राजवाडा यापेक्षा कमी नाही असं यात म्हटलं गेलं. ती किती आलिशान पध्दतीने दुबईत जगतेय याची वर्णनं केली गेली. पण सोनालीनेच या सर्वांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रतिक्रीया देत चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सोनाली ट्विट करत म्हणते, अहो काहीही काय सांगता राव, राजमहाल काय ..साधा 2 बीएचके फ्लॅट आहे आमचा दुबईत. पण हो आम्ही..सुखी..समाधानी आणि निरोगी आहोत व हाच आमच्यासाठी राजमहाल आहे. 

सोनालीच्या या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive