By  
on  

या मराठी अभिनेत्रीचा पती आहे देशसेवेसाठी तत्पर, पहिल्यांदाच शेअर केले फोटो

सोशल मिडीयावर अनेकजण आपल्या वैयक्तिय आयुष्याबद्दल अथवा कुटुंबाबद्दल सांगायचं अथवा त्यांची ओळख करुन देण्याचं टाळतात. कधी कधी अनेक सेलिब्रिटीसुध्दा असं करतात. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. नानाविविध फोटोशूट, मेकअप व्हिडीओ, धम्माल मिमिक्री आणि बरंच काही ती चाहत्यांसाठी सादर करते.  पण क्रांतीने नेहमीच तिचं वैयक्तिक आयुष्य हे प्रकाशझोतापासून दूर ठेवणंच पसंत केलं. 

मार्च २०१७ साली समीर वानखेडे यांच्याशी क्रांतीने लग्नगाठ बांधली, परंतु या लग्नाबद्दल जास्त काही गाजावाजा माध्यमांतून झालाच नाही. कारण, याबाबत फारसं कुणाला माहितच नव्हतं. डिसेंबर २०१८ मध्ये तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. मधल्या काळात ‘ziyazyda’ या कपड्यांच्या ब्रँडची स्थापना केली. क्रांती रेडकरने नेमके कोणासोबत लग्न केले याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर  समीर वानखेडे हे नाव खुप जास्त प्रमाणात चर्चेत आलं.  समीर वानखेडे हे २००४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकारी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती. क्रांती नेहमी तिच्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओ शेअर करत असते, मात्र सुशांतच्या केस नंतर पहिल्यांदाच तिने आपल्या पतीसोबत एक व्हिडिओ शेअर केला होता त्याला चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळाल्या आणि कौतुकही झालं..

क्रांतीला नेहमीच पती समीर यांच्याबद्दल अभिमान वाटतो. अलिकडेच क्रांतीने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिचे पती समीर वानखेडे आणि सास-यांचे पोलिस सेवेत कार्यरत असलेले जुने फोटो आहेत. देश सेवेसाठी तुम्ही सदैव तत्पर आहात, तमचा नेहमीच अभिमान राहील अशी पोस्ट तिने केली  आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive