By  
on  

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या दुस-या लग्नाची गोष्ट , पाहा हा गोड व्हिडीओ

मराठीतील दिग्गज नाट्य आणि सिनेदिग्दर्शक, निर्माते केदार शिंदे यांनी दुस-यांदा लग्नगाठ बांधली. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्ताने हा सोहळा घरच्या घरी काही दिवसांपूर्वीच साजरा करण्यात आला. केदार शिंदे यांचा लग्नाला ९ मे रोजी पंचवीस वर्ष पुर्ण झाली.

केदार शिंदे यांनी रविवारी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. आपल्या पत्नीसोबतच त्यांनी पुन्हा लग्न केलं. पंचवीस वर्षापुर्वी त्यांच कोर्टमॅरेज झाले होत त्यामुळे लग्नात कुठलीच हौसमौज करता आली नव्हती. पण यावेळेससुध्दा करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे घरीच छोटा सोहळा आयोजित केला. 

केदार शिंदे या लग्नसोहळ्यातला गोड व्हिडीओ शेअर करत म्हणतात, " हा खुप खास व्हिडिओ आहे.. आमच्या लग्नाला २५ वर्ष पुर्ण झाली.. २५ वर्षांपूर्वी आम्ही पळून जाऊन लग्न केलं. त्यावेळी कोणतेही विधी झाले नाहीत.. २५ वर्षांनंतर आमची मुलगी @sanashinde हीने शास्त्र शुद्ध लग्न करायचं ठरवलं.. पण #lockdown मुळे काही शक्य नव्हतं.. @aadesh_bandekar @suchitrabandekar #prashantgoankar #ranjitagoankar @soham_bandekar_ यांच्या मदतीने सनाने पुर्ण तयारी केली.. ९ मे रोजी हा घरगुती समारंभ पार पडला.. ९ मे १९९६ रोजी ७५०/- रुपयांत लग्न केलं.. २५ वर्षांनंतर आत्ताच लग्न सुध्दा
#lockdown2021 मुळे फारच आटोक्यात पार पडलंय.. या दिवसात खरच काही परवडत नाही.. पण आयुष्यात सकारात्मक राहायचं असेल तर काही तरी करायलाच हवं.. आपल्या शुभेच्छा आशिर्वाद सतत सोबत राहू द्या.. श्री स्वामी समर्थ आहेतच पाठीशी!!!! "

 

केदारकडून प्रशांत गवाणकर कुटूंबीय होते तर बेला कडून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive