By  
on  

सा रे गा मा या स्पर्धेदरम्यान गातानाचा व्हिडियो अवधूत गुप्तेने केला शेअर

दिग्दर्शक, गायक अवधूत गुप्ते सध्या  ‘सुर नवा ध्यास नवा आशा उद्याची’ या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसतो आहे. यादरम्यान तो अनेकदा आठवणी शेअर करताना दिसतो. अवधूतने सारेगमा या शोमधून करिअरची सुरुवात केली. या शोमधली एक आठवण अवधूतने शेअर केली. विशेष म्हणजे या व्हिडियोमध्ये प्रसिद्ध गायक सोनू निगमही दिसतो आहे. 

 

 

या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘बऱ्याचदा लोक विचारतात की, परिक्षकाच्या खुर्चीत बसून सुद्धा स्पर्धकांप्रती इतकी आत्मीयता आणि खेळकरपणा कसा काय टिकवून ठेवू शकतोस? तर त्याचं उत्तर एवढंच की मी जेव्हा स्पर्धक होतो तेव्हा स्टेजवर गायला जाण्याआधीची छातीतली धडधड, पोटातला खड्डा, उघड्या डोळ्यांमधले स्वप्न आणि माघारी कौतुकासाठी पाणावलेले आईचे डोळे मी कधीच विसरलो नाही.. आणि मेंदूला ते विसरु देत नाही! त्यातून कधी विस्मरण झालेच तर हा व्हिडिओ बघतो. तुम्ही सुद्धा पहा आणि मी कधी विसरतो आहे असं तुम्हाला वाटलं, तर मलाच दाखवा! Watch full video on my YouTube channel.  ता. क. - तो मधेच बाईच्या आवाजात "और" म्हणणारा चावट मुलगा म्हणजे सोनूजी!

Author

Recommended

PeepingMoon Exclusive