By  
on  

सचिन पिळगावकर करतायत लाडक्या लक्ष्याला मिस , शेअर केला हा फोटो

आपल्या अफलातून विनोदांसाठी आणि त्यांच्या अचूक टाईमिंगसाठी ओळखला जाणारा मराठी सिनेसृष्टीच्या लाडका लक्ष्याला प्रेक्षक आजही मिस करतात. सुपरस्टार अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे आजही पुन्हा पुन्हा पाहिले जातात. टेन्शन विसरायला लावणा-या त्यांच्या सिनेमांचे फॅन आजची पिढीसुध्दा आहे. मराठी सिनेमा, नाटक आणि मग हिंदी सिनेविश्वसुध्दा लक्ष्याने आपल्या सहज-सुंदर अभिनयाने गाजवलं. प्रत्येक कलाकृतीमध्ये लक्ष्याने त्याच्या खास शैलीतील अभिनयाचा ठसा उमटवला. 

आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांना विसरणं शक्यच नाही. म्हणूनच लक्ष्मीकांत यांचे जिगरी दोस्त आणि अनेक सिनेमांतले सहकलाकार-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी एक खास फोटो शेअर करत लक्ष्याची खुप आठवण येतेय, असं म्हटलंय. अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना केक भरवतानाचा लक्ष्याचा एक दुर्मिळ फोटो सचिनजींनी नुकताच चाहत्यांशी शेअर केलाय. तसंच मिस यू लक्ष्या असं कॅप्शन देत सचिजींना लक्ष्याची प्रचंड आठवण येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. 

 

लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर, हे अभिनेत्यांचं त्रिकुट म्हणजे जबरदस्त हंगामा सिनेमात होणार हे प्रेक्षक अचूक जाणायचे. अशीही बनवाबनवी, भूताचा भाऊ आणि आयत्या घरात घरोबा अशा अनेक सिनेमांमधून या त्रिकुटाने धुमाकूळ घातला. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive