By  
on  

सई ताम्हणकरच्या या क्युट फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव

मराठी सिनेसृष्टीतील  बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच सईने एक क्युटवाला  टो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सईला कुत्र्यांचे छोटे पिल्लू म्हणजेच पप्पीज् खुप आवडतात. त्यांच्यासोबतचा हा कॅन्डीड क्षण सईने चाहत्यांशी शेअर केला आहे. 

 

 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोच्या परिक्षकपदी विराजमान असलेली सई ताम्हमणकर विविध आऊटफिट कॅरी करत चाहत्यांची मनं जिंकते.  पण तिच्या या थ्रोबॅक फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. आत्तापर्यंत या फोटोवर 58 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. 

 

हासुध्दा सईचा एक क्युट थ्रोबॅक फोटो आहे. 

 

सई ताम्हणकर बॉलिवूडच्या मिमी सिनेमातून आणि मधुर भांडारकरच्या इंडिया लॉकडाऊनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसंच सईचा आगामी कलरफुल हा मराठी सिनेमासुध्दा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive