By  
on  

या मराठी अभिनेत्रीने बेबी बंप फ्लॉण्ट करत सांगितली प्रवासाची गोष्ट

मराठी अभिनेत्री आणि प्रसिध्द युटयूबर उर्मिला निंबाळकर हिने काही महिन्यांपूर्वीच आपण आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. अभिनयाबरोबरच ऊर्मिला सध्या ट्रव्हलिंग आणि इतर विषयावरील व्हिडीओ ब्लॉग करते. महत्त्वाचं म्हणजे तिचा येणारा चिमुकला-चिमुकलीलासुध्दा भटकंतीची आवड असल्याचं तिनेच चाहत्यांना एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 

उर्मिला आपला सातव्या महिन्यातला बेबी बंप फ्लॉण्ट करत म्हणते, " सातवा महिना आणि बाळाने,बोटीतून, कारमधून, बाईकवरुन, रिक्षातून,विमानातून आणि आता राजधानी एक्सप्रेसमुळे रेल्वेतूनही प्रवास केला! प्रवासाचा आनंद घेण्यासाठी तर कधी, कोरोनापासून वाचण्यासाठी तर कधी, त्याच्या मामाची  बदली झाल्यामुळे आणखी उत्तम, सुंदर, सुरक्षित जागी, स्थलांतरण करण्यासाठी का होईना, या सात महिन्यात माझा भरपुर प्रवास झाला! या संपुर्ण प्रवासात मला बाळाने कमालीची साथ दिली. तिला/त्याला किती वेळा धन्यवाद द्यावेत तेवढे कमी! आत्तापासूनच आईला सुख देणाऱ्या बाळाला अशक्य प्रेम ♥️बाळ १००% त्याच्या वडिलांप्रमाणे  Traveller होणार हे निश्चित! "

 

 

अभिनेत्री आणि व्हिडिओ ब्लॉगर ऊर्मिला निंबाळकर सगळ्यानांच माहिती आहे. ऊर्मिलानं हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. दिया और बाती ही तिची मालिका चांगलीच गाजली. त्याचबरोबर तिने काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

 

 

उर्मिला प्रेगन्सीमद्येसुध्दा अनेक धम्माल व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करत असते.  

 

 सोशल मिडीयावर उर्मिलाच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांची भरपूर पसंती मिळते. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive