By  
on  

'मी राम-लक्ष्मण या संगीतकार जोडीसाठी अनेक गाणी गायले जी लोकप्रिय ठरली'

ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण जोडीतील विजय पाटील  यांचे नागपुरात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि नागपुरात आपल्या मुलासोबत राहत होते. मध्यरात्री 1 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 79 वर्षांचे होते आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांनी हिंदी, मराठीसह भोजपुरी सिनेमांनासुध्दा संगीत दिलं होतं. संगीत क्षेत्रात भरीव योगदान देणा-या राम-लक्ष्मण यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. 

विजय पाटील यांच्या निधनावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीसुध्दा ट्विटरच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे. त्या म्हणतात,मला आत्ताच त्यांच्या निधनाबद्दल समजलं. मला खुप दु:ख होत आहे. विजय पाटील हे खुप गुणी कलाकार आणि चांगले व्यक्ती होते. मी त्यांची अनेक गाणी गायली आहेत. जी प्रचंड लोकप्रिय झालीत. मी त्यांना श्रध्दांजली अर्पण करते. 

 

दादा कोंडकेंच्या  पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी राम-लक्ष्मण जोडीने सिनेसृष्टीला दिली. ‘राजश्री’चा सिनेमा म्हटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण नुसते रुढच झाले नाही तर यशस्वीही झाले. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive