By  
on  

प्रार्थना बेहरेने घेतलेला हा निर्णय पाहून तुम्हीही म्हणाल वा !!

सध्या करोनामुळे प्रत्येकावरच बिकट परिस्थिती आली आहे. करोनामुळे अनेकांना आर्थिक, शारिरीक, मानसिक नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. अशावेळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे गरजूंच्या मदतीला धावून आली आहे. प्रार्थनाने लॉकडाऊनमध्ये अनेक पेंटिंग केले आहेत. हे पेंटिंग विकून आलेले पैसे प्रार्थना गरजवंतांना देणार आहे.

 

 

आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘नमस्कार !!!! "कोरोना'च्या सध्याच्या अवताराने जगात धुमाकूळ घातलाय, हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. कोरोनामुळे अनेकांना शारीरिक व आर्थिक समस्यांना सामोरी जावं लागतय ,आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला खूप हाल सोसावे लागताय ... अश्यावेळी मी त्यांच्या साठी काय करू शकते हा विचार नेहमी माझा मनात यायचा ? लॉकडाउनच्या काळात मी पेंटिंग करायला सुरवात केली आणि त्याच वेळी मला माझ्या मैत्रिण @rjsmee कडून ह्या paintings ना विकून, त्या रकमेतून गरजू लोकांना मदत करण्याची कल्पना सुचली. स्वतःच art विकायला कोणालाच आवडत नाही पण मी हे पेंटिंग पैसे कमावण्यासाठी विकत नसून ह्या मधून मिळणारी सर्व रक्कम समाज कार्यासाठी वापरायचे ठरवले आहे. माझ्याकडून एक मदत म्हणून मी हा उपक्रम राबवत आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्वांची मदत हवी आहे.

हे पेंटिंग विकायला आहेत म्हणून घेऊ नका, तर ते पैसे तुम्ही समाज कार्यासाठी दान करत आहेत अशी भावना ठेवा आणि त्या बद्दल माझ्या कडून हे पेंटिंग रिटर्न गिफ्ट आहेत असे समजा.  जे लोकं पेंटिंग विकत घेतील त्या सर्वांना लॉकडाउन संपल्यावर कुरिअरनी ते घरपोच पाठवले जातील व मी स्वतः त्यांना संपर्क करिन. ह्या उपक्रमा मधून मिळणारा आनंद, समाधान आणि तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर ह्या उपक्रमात सामील व्हावे हीच प्रार्थाना

Author

Recommended

PeepingMoon Exclusive