By  
on  

‘गुलाबाची कळी’ तेजस्विनी पंडीतच्या या लूक्सनी चाहत्यांना लावलं वेड

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचा आज वाढदिवस आहे. आपल्या अभिनय आणि लूक्स तेजस्विनीने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. घारे डोळे आणि नितळ चेहरा लाभलेल्या तेजस्विनी पंडितचं फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. तेजस्विनी एक उत्तम अभिनेत्री आहे. एक स्टाईल आयकॉनही आहे. नवीन नवीन स्टाईल्स ट्राय करायला आणि आपल्याशा करायला ती अजिबात मागेपुढे पाहात नाही.

 

 

दरवर्षी नवरात्रीमध्ये चर्चा असते ते तिच्या हटके लूक्सची. तेजस्विनी नवरात्रीचे नऊ दिवस वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसते. विशेष म्हणजे या लूक्समधून ती अनेक सामाजिक संदेशही देत असते. 

 

 

तेजस्विनी अनेकदा सामाजिक विषयांवरही व्यक्त होताना दिसते. अभिनया व्यतिरिक्त एक यशस्वी उद्योजक म्हणूनही तिने ओळख बनवली आहे. रंगभूमी, सिनेमा, मालिका, वेबसिरीज या सगळ्या माध्यमांमध्ये आपली छाप सोडलेल्या तेजस्विनीला पीपिंगमून मराठीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive