By  
on  

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण

रंगभूमी, सिनेमा, मालिका, वेबसिरीज या सगळ्या माध्यमांमध्ये आपली छाप सोडलेल्या तेजस्विनी पंडितने आता आणखी एका क्षेत्रात श्रीगणेशा केला आहे. ‘क्रिएटिव्ह वाईब’ च्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात प्रवेश करते आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तिने या नवीन उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. ‘क्रिएटिव्ह वाईब’ अंतर्गत सिनेमा, सिरीज, शोज अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांची निर्मिती केली जाणार आहे. 

 

 

आपल्या पोस्टमध्ये तेजस्विनी म्हणते, ‘वाढदिवशी तुमच्या आवडीची गोष्ट करायची असते असं मोठे लोक म्हणतात ! कलाकारांसाठी कलेच्या निर्मिती इतकी आवडती गोष्ट दुसरी कोणती असणार ? आणि म्हणूनच इतक्या दिवशीच्या स्वप्नाकडे आज पहिलं पाऊल टाकतोय !
Creative Viibe निर्मिती क्षेत्रातलं आमचं पहिलं पाऊल ! आमचं म्हणजे मी आणि माझा मित्र संतोष खेर चं !
Trust me आत्ता खुप mixed emotions आहेत पण सर्वात वर फक्त आनंदाची आणि समाधानाची भावना आहे...आणि आमच्या कालाकृतींमधून ते आम्ही तुमच्या पर्यंत पोचवण्याचा मनापासून प्रयत्न करू.’ ‘क्रिएटिव्ह वाईब’चा पहिलाच प्रोजेक्ट एक मराठी वेब शो असल्याचंही समोर येत आहे. तेजस्विनीच्या या नव्या व्हेंचरसाठी सिनेसृष्टीतील कलाकार आणि फॅन्स यांच्याकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive