अभिनेता अनुप सोनी यांनी अनेक मालिकांमधून प्रेक्षकांना अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अनुप यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. बालिकावधू, सीआयडी, क्राईम पेट्रोल यांसारख्या अनेक मालिका आणि शोजमध्ये अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर अनुप आता मराठी सिनेमात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनुप ‘फत्तेशिकस्त’ या मराठी सिनेमातून रसिकांसमोर येणार आहे. या सिनेमात अनुप खलनायक साकारताना दिसेल.
https://twitter.com/DigpalOfficial/status/1123459753198391296
https://www.instagram.com/p/Bws7-6plaep/?utm_source=ig_web_copy_link
शिवरायांची युद्धनिती आजही आदर्श मानली जाते. पुरेशा सैन्यबळाअभावीही गनिमांची दाणादाण उडवणारी युद्धनिती म्हणून याकडे पाहिलं जातं. ‘फत्तेशिकस्त’ सिनेमा याच तंत्रावर बेतलेला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आहेत. आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेला ‘फत्तेशिकस्त’ हा सिनेमा इतिहासातील सगळ्यात पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार रसिकांसमोर उभा करेल यात शंका नाही. अनुपसोबत या सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे हे कलाकार असणार आहेत.