By  
on  

या प्रसिध्द मराठी दिग्दर्शकाने जपली सामाजिक बांधिलकी, केलं मदतीचं आवाहन

करोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात धुमाकूळ घातलाय. अद्यापही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अहोरात्र झटतायत.  या लाटेमुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनच्या तुटवडा, बेड्स, औषधं अशा अनेक समस्यांचासुध्दा  सामना करावा लागत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊनसारखे कडक निर्बंधसुध्दा लावले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणा-या मजुरांचे बरेच हाल झाले. त्यातच लॉकडाऊनमुळे सिनेमा मालिकांचं चित्रिकरणसुध्दा महाराष्ट्रात करण्यास बंदी आणली. त्यामुळे अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलीय.

या कठीण काळात बरेच लोक आणि सेलिब्रिटी एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपतायत. प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव यांनीसुध्दा पत्नी मेघना जाधव हिच्या साथीने एका सामाजिक संस्थेसोबत गरजूंना दोन घास खाऊ घातले. 

ही हदयस्पर्शी पोस्ट करताना रवी जाधव लिहतात, " विथ आर्य या श्री @vikrant.bhatkar.1 आणि सौ शीतल भाटकर यांनी सूरू केलेल्या नोंदणीकृत सामाजिक संस्थेसोबत मी आणि मेघना माझे मित्र @see_mahimkar आणि @ketakimahimkar यांच्यामुळे जोडले गेलो आणि संकट काळात मिळालेल्या मदतीनंतर लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद त्यांच्या मास्कच्या पलिकडे जाऊन जवळून पाहता आला. तो आनंद पाहून आपल्याला जे समाधान मिळते त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. आपल्या सर्वांनाही नम्र विनंती आहे की शक्य असल्यास ‘विथ आर्य’ च्या ह्या कार्यात सहभागी व्हा." 

 

 

रवी जाधव यांच्या या कार्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive