By  
on  

पंतप्रधानांवरील टिका पडली महागात, प्रियदर्शन जाधवला करावा लागला ट्रोलिंगचा सामना

अभिनेता प्रियदर्शन जाधव सध्या ट्वीटमुळे ट्रोलर्सच्या कचाट्यात सापडला आहे. प्रियदर्शनने पंतप्रधानांवर केलेल्या ट्वीटमुळे ट्रोल होण्याची वेळ आली आहे. प्रियदर्शनने पंतप्रधानांबाबत नाराजी व्यक्त करणारं ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये तो म्हणतो,

‘राजीव गांधी ह्यांच्या विधानाने तर पूर्णपणे मनातून उतरलात ! @narendramodi सामान्य माणसाला काहीच कळत नाही, अशा भ्रमात राहू नका.ही तीच माणसं आहेत ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली आणि काँग्रेस ला घरी बसवलं....( बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही )’

यावर ट्रोलर्स म्हणतात,

https://twitter.com/filmy_kida/status/1125684041242431488

https://twitter.com/swapnp/status/1125960605947404288

या ट्वीटमुळे त्याला नेटक-यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. आता यावर प्रियदर्शनची प्रतिक्रिया काय आहे हे समजू शकलेलं नाही. प्रियदर्शन अलीकडेच ‘मी पण सचिन’ सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive