By  
on  

पाहा Video : गोव्याच्या किना-यावर दिसल्या 'टकाटक गर्ल'च्या बिनधास्त-बेधडक अदा

'टकाटक' सिनेमामुळे प्रसिध्द झालेली बोल्ड अभिनेत्री म्हणजेच प्रणाली भालेराव . टकाटक गर्ल हीच आता तिची ओळख बनली आहे. प्रणालीच्या डान्सचा जलवासुध्दा युवा डान्सिंग क्वीन्स या डान्स रिएलिटी शोमध्ये पाहायला मिळाला. सोशल मिडीयावरसुध्दा प्रणाली हटके फोटोशूट आणि रील व्हिडीओंच्या माध्यमातून रसिक चाहत्यांच्या संपर्कात असते. 

बॉक्स ऑफिसवर टकाटक आणि प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट आता सिक्वेलच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘टकाटक’ने रसिकांची प्रचंड वाहवा मिळवली. 

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरच ह्या सिनेमाच्या सिक्वलची घोषणा झाली. काही महिन्यापूर्वीच गोव्यात या सिनेमाच्या सिक्वलच्या शूटींगचा श्रीगणेशा झाला. यानिमित्ताने प्रणालीने गोव्यातील तिचे काही दिलखेचक व्हिडीओ चाहत्यांशी शेअर केले. 

 

समुद्रकिनारी टकाटक गर्ल प्रणालीच्या ह्या बिनधास्त बेधडक अदा पाहून चाहते एकदम फिदा झाले आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive