By  
on  

'शनाया' फेम रसिका सुनिल या व्यक्तिला करतेय मिस, म्हणते आता विरह सोसवेना

'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील शनाया म्हणून अभिनेत्री रसिका सुनील ही महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मिडीयावरुन रसिका आपल्या बोल्ड आणि बुटिफुल अंदाजातून चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. पण ब-याच कालावधीनंतर रसिकाने केलेली पोस्ट लक्षवेधी ठरतेय.

रसिका एका व्यक्तिला खुप मिस करतेय  आणि हा व्यक्ती दुसरा-तिसरा कुणी नसून तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागी आहे. बहुधा लॉकडाऊनमुळे दोघंही एकमेकांना भेटू शकत नाहीत. त्यामुळे ह्या कपलची लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप सुरु आहे.  म्हणूनच हा क्यूट फोटो शेअर करत रसिकाने लवकरच भेट असं रसिकाने आदित्यला म्हटलंय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

यंदा नववर्षाचं स्वागत करताना रसिकाने मित्र आदित्य बिलागीसोबतचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला  होता. 

सोशल मिडीयावरुन रसिकाने आपण आदित्यला डेट करत असल्याची जाहिर कबुली दिली होती. 

लॉस एंजिलिसमधून रसिकाने हे फोटो पोस्ट केले होते आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला . 

 

दोन वर्षांपूर्वी रसिकाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिची आदित्यशी ओळख झाली व मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive