By  
on  

ब्रिटनच्या राजपुत्राचं 'सैराट' कनेक्शन, आर्ची नावावरून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

ब्रिटनचा राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी ६ मे रोजी बाळाला जन्म दिला. बाळाचं नाव काय ठेवणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर ब्रिटनच्या राजघराण्याने नवीन बाळाचं नाव जाहीर केलं असून 'आर्ची' असं बाळाचं नामकरण करण्यात आलं आहे.

https://www.instagram.com/p/BxNT4g-AWm3/?utm_source=ig_embed

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी आर्ची हे नाव ठेवताच भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 'सैराट' या सिनेमात रिंकू राजगुरूच्या व्यक्तिरेखेचं नाव 'आर्ची' असं होतं. त्यामुळे अनेकजण या नावाचं सैराट कनेक्शन जोडत आहेत.

https://www.instagram.com/p/BxNm0ioHsIv/

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी आपल्या इंस्टाग्रामवरून 'आर्ची हॅरिसन माऊंटबेटन विंडसर' असं बाळाचं पूर्ण नाव जाहीर केलं. हे नाव ऐकताक्षणी नेटकऱ्यांनी या नावाचा सैराट संबंध जोडला. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी बाळाचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला. ब्रिटनच्या राजघराण्याच्या उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत हे बाळ सातव्या क्रमांकावर असेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive