By  
on  

प्रसिद्ध तमाशा कलाकार कांताबाई सातारकर काळाच्या पड्द्याआड

तमाशाच्या मंचावर  शिवाजी संभाजी या पुरुषी भूमिका साकारणा-या लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं करोनाने निधन झालं आहे. त्या 82 वर्षांच्या होत्या. तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या त्या आई आहेत. कांताबाईंच्या संपुर्ण कुटुंबाने तमाशा या कलाप्रकाराच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतलं आहे. काही दिवसांपुर्वी कांताबाई यांच्या घरातील सगळ्या सदस्यांना करोनाची लागण झाली होती.

 

सर्वांची प्रकृती ठीक झाली तरी कांताबाई यांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा झाली नाही. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘रायगडची राणी’ या वगनाट्यासोबतच ‘गवळ्याची रंभा’, ‘गोविंदा गोपाळा’, ‘१८५७ चा दरोडा’, ‘तडा गेलेला घडा’, ‘अधुरे माझे स्वप्न राहिले’, ‘कलंकिता मी धन्य झाले’, ‘असे पुढारी आमचे वैरी’, ‘डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘कोंढाण्यावर स्वारी’ या वगनाट्यांने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive