By  
on  

शेतात रमली ही प्रसिध्द मराठी अभिनेत्री-निवेदिका, पिकवतेय फळं आणि भाज्या

अभिनय क्षेत्रापासून दूर जाऊन काहीतरी वेगळी वाट चोखंदळायला मोठी हिंमत लागते. चौकटी बाहेर जाऊन वेगळं काही करुन दाखविण्यासाठी अपार कष्ट आणि जिद्द याचीसुध्दा जोड लागते. अशीच वेगळी वाट निवडत आपलं इच्छित ध्येय गाठलंय प्रसिध्द अभिनेत्री आणि निवेदिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी  व तिचे पती राहुल कुलकर्णी यांनी. संपदा व तिचे पती राहुल यांनी हिरवीगार शेती फुलवून त्यातून कृषी पर्यट उभं केलं आहे. आनंदाचे शेत असं त्यांच्या या प्रकल्पाचं नाव आहे. 

कोकणात त्यांनी हा पर्यटन प्रकल्प राबवला आहे. रत्नागिरीतील फुणूसवाडी येथे आनंदाचे शेत हा कृषी पर्यटन प्रकल्प आहे. आनंदाचे शेतसाठी संपदाने आपलं अभिनय क्षेत्रातलं यशस्वी करिअर सोडलं तर तिचे पती राहुल यांनी त्यांची क्रिएटिव्ह क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिलीय. दोघांनीसुध्दा आपल्या करिअरवर विचारपूर्वक पाणी सोडलं आणि शेतात राबण्याचं ठरवलं. 

या दोघांनी शेतीचा जमेल तितका अभ्यास, तज्ञांचे सल्ले, इंटरनेट यांच्या साह्याने फळं, भाज्या अशी विविधं पिकं घेत शेती फुलवलीय. फार्म ऑफ हॅप्पीनेसचा भाजीपाला आणि फळं थेट मुंबईतसुध्दा विक्रीसाठी जातो. 

 

नेमकी फार्म ऑफ हॅप्पीनेसची संकल्पना अशी...

 

आजकाल टीव्ही, मोबाईलच्या युगात मुलांना गाव काय असतं गावाकडचं जेवण, तिथला दिनक्रम याची माहिती नसते. या एग्री टुरिझममध्ये मुलांना घोडागाडीची सफर, शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांची इत्त्थंभूत माहिती देणं, जेवताना शेतात पिकलेल््या ताज्या भाज्या, फळं यांचा मनसोक्त आस्वाद. निसर्गसानिध्यात दोन निवांत क्षण काय असतात हे मुलांना पटवून देणं 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive