By  
on  

अभिनयातच नाही तर या कलेतही ऋतुजा बागवे आहे पारंगत, पाहा व्हिडियो

अभिनेत्री ऋतुजा बागवेने आजवर नाटक आणि टीव्ही मालिकांतून प्रेक्षकांच्या पसंतीचे पावती मिळवली आहे. ऋतुजानं आतापर्यंत मालिका आणि नाटकांतून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे ऋतुजा आणखी एका कलेतही पारंगत आहे. ऋतुजा उत्तम मुकाभिनय करते. 

 

 

मागील वर्षी झालेल्या ऑनलाईन माझं थिएटर या स्पर्धेमध्ये तिने माईमिंग म्ह्णजेच मुकाभिनय सादर केला होता. त्याचा व्हिडियो तिने अलीकडेच शेअर केला आहे. या कार्यक्रमात ऋतुजाने  '२ फुल्या ३ बदाम'  या संघाकडून हे नाट्य सादर केलं होतं. विशेष म्हणजे या संघाला विजेतेपदही मिळालं होतं. ऋतुजाच्या या व्हिडियोवर सुबोध भावे, स्पृहा जोशी, भुषण प्रधान, गौरी नलावडे यांनी कमेंट करत कौतुक केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive