By  
on  

सई म्हणजेच गौतमी देशपांडेला झाला आहे या गोष्टीचा खास आनंद

 'माझा होशील ना' ही मालिका दिवसेंदिवस आणखी रंजक वळणावर येते आहे. सईनेसुध्दा आपल्या लाघवी स्वभावाने आदित्यसोबतच सर्व मामांची मनं जिंकून घेतली आहेत. माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतली सई म्हणून गौतमीने तमाम रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या गौतमी जास्त आनंदात आहे. लोभस लूक आणि गोड आवाज असलेली गौतमीने तिच्या चाहत्यांशी खास बातमी शेअर केली आहे. 

 

 

आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये गौतमी म्हणते, ‘ आनंदाचं कारण म्हणजे माझा होशील ना 300 एपिसोड पुर्ण झाले आहेत. याशिवाय माझेही चार लाख फॉलोअर्स पुर्ण झाले आहेत. या सगळ्या प्रेमासाठी तुमचे आभार. प्रेम असेच राहू द्या.’ 
मालिकेत सई आणि आदित्यसाठी सध्या कसोटीचा काळ सुरु आहे. पण हे दोघंही यातून कसा मार्ग काढतात ते लवकरच कळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive