By  
on  

पुजा सावंतची ही व्यक्तिरेखा आहे तिच्या सगळ्यात जवळची

लोभस चेहरा लाभलेली अभिनेत्री पुजा सावंत 2019मध्ये ‘जंगली’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमात तिने विद्युत जामवालसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमातील तिच्या कामाचं खुप कौतुक देखील झालं.  हा सिनेमा वन्य जीवन आणि त्यासंबंधी घडणा-या घटनांवर आधारलेला आहे. हत्ती आणि त्यांच्या सुळ्यांच्या तस्करीवर या सिनेमाने प्रकाश टाकला आहे.

 

 

या सिनेमात तिने शंकराही व्याक्तिरेखा साकारली होती. यामध्ये पुजाची व्यक्तिरेखा हत्तींवर प्रेम करताना दिसते आहे. पुजाने नुकताच या सिनेमातील व्हिडियो पोस्ट केला आहे. यामध्ये पुजा शंकराच्या व्यक्तिरेखेत दिसते आहे. शंकरा... व्यक्तिरेखा जी माझ्या मनाच्या जवळ आहे. हे कॅप्शन देत तिने हा व्हिडियो शेअर केला आहे. या सिनेमातून पुजाने तिचा बॉलिवूड डेब्यु केला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive