By  
on  

प्रिया बापटने गच्चीवरच केलं जबरदस्त फोटोशूट

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून प्रिया बापट ओळखली जाते. सिनेमांसोबतच वेबसिरीजचा प्लॅटफॉर्मही प्रिया गाजवतेय. सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रिया सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. 

सध्या करोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात धुमाकुळ घातलाय त्यामुळे लॉकडाऊन आहे व योग्य ती खबरदारी घेत सर्वांनी घरीच थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. म्हणूनच या काळात प्रियानेसुध्दा घराबाहेर न जाता घराच्या गच्चीतच छानसं फोटोशूट केलं आहे. 

फिटनेस फ्रिक असलेली प्रिया लॉकडाऊनच्या काळातसुध्दा घरच्या घरी फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

 

 

प्रियाच्या या हटके फोटोशूटने सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 

प्रियाने गच्चीवर केलेलं हे खास फोटोशूट सध्या चाहत्यांना खुप आवडतंय. 

महत्त्वाचं म्हणजे प्रियाने गच्ची नावाचा सिनेमाही केला आहे. यात अभिनेता अभय महाजन तिचा नायक होता. 

 

प्रियाच्या रिफ्रेशिंग फोटोशूटमुळे नेहमीच सकारात्मक राहण्याचा संदेश मिळतो. 

Recommended

PeepingMoon Exclusive