By  
on  

महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावली अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद

करोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात धुमाकूळ घातलाय. अद्यापही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अहोरात्र झटतायत.  या लाटेमुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनच्या तुटवडा, बेड्स, औषधं अशा अनेक समस्यांचासुध्दा  सामना करावा लागत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊनसारखे कडक निर्बंधसुध्दा लावले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणा-या मजुरांचे व गोर-गरिब जनतेचे बरेच हाल होत आहेत. अनेक सेलिब्रिटी या संकटकाळात आपापल्यापरिने मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. आता प्रसिध्द अभिनेत्री आणि नृत्यांगना दिपाली भोसले-सय्यद हीसुध्दा महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. 

. महामारीच्या काळात अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे या कठीण काळात मदतीचा हात दिपालीने गरजवंतांसाठी पुढे केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत अधिक माहिती पुढिलप्रमाणे… करोना पार्श्वभूमी वर सर्व सामान्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर दिपाली भोसले -सय्यद को’रो’ना हेल्पलाईन मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत यात पेशंटला तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले आहे… शिवाय ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येईल …रेमडीसीवर इंजेक्शन ची गरज भासल्यास जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील…एखादे खाजगी हॉस्पिटल बिल जास्त घेत असल्यास किंवा स्वच्छता नसल्यास तसेच पेशंट वर उपचार करतांना हलगर्जीपणा करत आहे अशी तक्रार प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन त्या हॉस्पिटलवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. सामान्य नागरिकांच्या अशा अनेक अडचणी सोडवण्यासाठी सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबलच्या माध्यमातून त्यांनी हेल्पलाईनची स्थापना केली असून आहे. या साठी प्रत्येक जिल्हात 100 प्रतिनिधी बारकाईने लक्ष देऊन मदत करतील. 

संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास *दिपाली भोसले सय्यद कोरोना हेलपलाईन* चे 2800 प्रतिनिधी काम पाहतील

 

दिपालीच्या या कार्याचं सर्वच स्तरातून खुप कौतुक होत आहे. अनेक करोना पिडीत व अडचणीत सापडलेल्या गरजवंतांना या हेल्पलाईनमुळे मोलाची मदत मिळणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive