By  
on  

'राजा राणीची गं' जोडी मालिकेतील संजूचे हे ऑफस्क्रीन मूड्स तुम्ही पाहिलेत का?

राजा राणीची गं जोडी ही छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक. रणजीत ढाले-पाटील आणि संजीवनीची अनोखी प्रेमकहाणी आणि त्यांच्या संसारातील चढ-उतार यावर ही मालिका भाष्य करते. 


संजीवनी आणि तिचा फौजदार म्हणजेच रणजीत यांचं नातं जुळल, ते लग्न बंधनात अडकले.

..अतिशय अल्लड अशी संजु जिची खूप साधी स्वप्नं आहेत तिला लग्नानंतर अत्यंत लहान वयात जीवनाची खूप मोठी लढाई लढावी लागणार आहे या सत्यापासून ती अनभिज्ञ होती... ढाले पाटील यांच्या घरातील चालीरीती, नियम सांभाळताना ती हळूहळू संपूर्ण कुटुंबाचा आधार बनली.

आता संजू फौजदार बनून रणजीतचं स्वप्न पूर्ण करतेय. 


संजू साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनारचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. 


सोशल मिडीयावर संजू फेम शिवानी मालिकेच्या सेटवरचे तिच्या विविध मूडसमधले फोटो चाहत्यांशी शेअर करते. 

शिवानीने ऑनस्कीन कॅरेक्टरमधले हे ऑफस्क्रीन क्षण चाहत्यांशी शेअर केले आहे. 

लाडक्या संजीवनीच्या या फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive