यासाठी बदलली ‘मराठी बिग बॉस2’ ची रिलीज डेट, या दिवशी होणार प्रसारित

By  
on  

सध्या मराठी रसिकांना आतुरता आहे ती मराठी बिग बॉस2’च्या पहिल्या एपिसोडची. पण यासाठी मात्र रसिकांना वाट पहावी लागणार आहे. कारण या एपिसोडच्या प्रसारणाची तारीख पुन्हा बदलली आहे. हा लोकप्रिय शो आता २६ मे ला प्रसारित होणार आहे. २३ मे ला लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर हा शो सुरु करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1123519933227372544

मागील महिन्यापासून दुसऱ्या सीझनचे प्रोमोज टीव्ही वर दाखवले जात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात नव्या सीझनबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या सीजनचं सुत्रसंचालनही महेश मांजरेकर यांच्या हातात आहे.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1125225450635190272

या सीझनमध्ये कोण कोण कलाकार असणार याची उत्सुकताही रसिकांच्या मनात वाढली आहे. यापैकी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचं नाव देखील चर्चेत आहे. याशिवाय ‘खुलता कळी फेम’ अभिनेत्री मयुरी देशमुख देखील ‘मराठी बिग बॉस-2’ मध्ये ती सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1122501326922027008

Recommended

Share