By  
on  

वयाची पन्नाशी ओलांडली तरी तरुणींना लाजवेल असा ऐश्वर्या नारकर यांचा उत्साह

मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक अशी अभिनयाची मुशाफिरी करणा-या प्रतिभावान व सौंदर्याचं ऐश्वर्य लाभलेल्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. आपण मालिकांमधून विविध व्यक्तिरेखांमधून त्यांना पाहिलंय. मात्र त्या ख-या आयुष्यात कशा मस्त बेधुंद जगतात हे त्यांच्या काही लेटेस्ट फोटोंवरुन पाहायला मिळतं.

अनेक वर्षांपासून नाटक, मालिका आणि सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या ऐश्वर्या नारकर यांचा खुप मोठा चाहतावर्ग आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेत अथर्वच्या आईची आणि अनन्याच्या  सासूची भूमिका साकारत आहेत.

कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेतील त्यांची प्रमुख भूमिका प्रचंड गाजली. 

 

 

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहते त्यांच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करतायत. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive