By  
on  

'तेरी मेरी यारी' ! या क्षेत्रातलं पहिलं पाऊल असो किंवा मग पहिली एकत्र सिरीयल प्रवास सोबतच करतोय

'लागिरं झालं जी' मालिकेतील अनेक कलाकार आज कलाविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतायत. मालिकेत विक्क्या साकारणारा अभिनेता निखिल चव्हाण अनेक सिनेमा, वेबसिरीज आणि आता कारभारी लय भारी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर याच मालिकेत भैय्यासाहेब ही निगेटिव्ह भूमिका साकारणारा किरण गायकवाड टोटल हुबलक, चला हवा येऊ द्या आणि आता देवमाणूस या मालिकेतून प्रेक्षकांवर गारुड करतोय. निखिल आणि किरण हे दोघेही अभिनेते ख-या आयुष्यात एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. 

आज अभिनेता निखिल चव्हाणचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपल्या दोस्ताला अभिनेता किरण गायकवाडने खास पोस्ट शेअर करत लय भारी शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच किरणने दोघांमधली मैत्री किती गाढ आहे हेसुध्दा सांगितलंय.

देवमाणूस फेम किरण गायकवाड पोस्टमध्ये म्हणतो,"आपली भेट होऊन खरंतर दहा वर्ष होऊन गेली तेव्हा पासून लोक चुकून तुला किरण आणि मला निखिल नावाने हाक द्यायचे ......... आपलं या क्षेत्रातलं पहिलं पाऊल असो किव्हा व्यावसायिक रंगभूमी वरचं पहिलं पाऊल असो ,पहिली आऊट ऑफ इंडिया ट्रिप असो , दोघांची पहिलीच सिरीयल असो तेव्हापासून आता पर्यंतचा प्रवास सोबत केलाय आणि पुढे हि असाच असेल .
तु कमाल आहेस ; लईभारी आहेस , तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच गणराया चरणी प्रार्थना लव्ह यु "

 

तसंच करिअरच्या सुरुवातीपासूनचे सर्वच आठवणीतले फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

 

या दोस्तांची दोस्तीगिरी पाहून चाहतेसुध्दा भलतेच खुश झाे आहेत आणि त्यांच्या या फोटोंवर लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करतायत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive