By  
on  

“अन्न हे पुर्णब्रह्म” हे आठवून खा.... .खास फोटोंसह प्राजक्ताचा मोलाचा संदेश

करोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात हाहाकार माजवला आहे. करोनामुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण निर्माण झालं असून लोक आरोग्याच्या बाबतीत बरेच सजग झाले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. फोटो व व्हिडीओंच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्क साधते. प्राजक्ता ही योगसाधना, उत्तम वर्कआऊट आणि सोबतच साधं सात्विक जेवण असं रुटीन फॉलो करते. फिटनेस फ्रिक प्राजक्ता नेहमीच आरोग्याची काळजी घेण्याबाबतच्या अनेक पोस्ट करताना दिसते. 

प्राजक्ताने नुकतंच नऊवारी साडीतलं जुन्या पिढीचं जीवनमान दर्शवणारं एक खास फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं व त्यासोबतच एक मोलाचा संदेश दिला आहे. प्राजक्ता म्हणते, खाली बसून, मन लावून, ताजं अन्न,“अन्न हे पुर्णब्रह्म” हे आठवून खा. जशी आपली आजी-आजोबांची पिढी खाण्याबाबतीत नियम पाळायची, जे खायची, ते खा आणि निरोगी रहा.

 

 

प्राजक्ताचं हा संदेश आणि तिचे हे फोटो पाहून चाहते खुपच खुश झाले आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive