By  
on  

आण्णा-शेवंताच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती, 'रात्रीस खेळ चाले’चे शंभर भाग पुर्ण

मराठी प्रेक्षकाने रहस्यकथेला कायमच पसंती दर्शवली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अशीच एक रहस्यकथा म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’. झी मराठीवरील या मालिकेच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली होती. कोकणातील पार्श्वभूमीवर आधारित असललेली ही भयकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेतील . या मालिकेतील आये, सुशल्या, दत्ता, नेने वकील, अभिराम, विश्वासराव या आणि इतर अनेक पात्रांनी लोकांची वाहवा मिळवली. या मालिकेने पहिल्या सत्रात दोनशे भाग पुर्ण केले. आता या मालिकेचा प्रीक्वेलही रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. यात आण्णा नाईक आणि सुशल्याची आई शेवंता यांच्या केमिस्ट्रीला पसंतीची पावतीही मिळत आहे. या मालिकेने नुकतेच शंभर भाग पुर्ण केले आहेत. या निमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. ही मालिका उत्तरोत्तर प्रेक्षकांचं मनोरंजन करेल यात शंका नाही.

 

Recommended

PeepingMoon Exclusive