By  
on  

मानसी नाईक पतीला म्हणतेय, "ये रात और ये दूरी..", पाहा हा धम्माल Video

अभिनेत्री मानसी नाईक तिचा प्रियकर प्रदीप खरेरासोबत अलिकडेच लग्नबंधनात अडकली. शाही थाटात मानसीचा लग्नसोहळा पार पडला होता. अभिनेत्रीसोबतच एक कुशल डान्सर असलेली मानसी सोशल मिडीयावर सतत डान्स रील व्हिडीओमधून चाहत्यांची मनं जिंकते. अनेकदा पती प्रदीपसोबतसुध्दा ती जबरदस्त थिरकते. तर कधी कधी खुपच रोमॅण्टिक होते.  नुकताच मानसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो खास तिने पती प्रदीपसाठी बनवलाय.

मानसीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय. माझा नवरा माझ्यापासून दूर गेल्यावर माझी अशी अवस्था होईल. अंदाज अपना अपना . या सुपरहिट क्लासिक सिेनेमातलं  ये रात और ये दूरी... या गाण्यावर मानसी जबरदस्त थिरकताना पाहायला मिळाली. यात ती नाईटसूटमध्ये पाहायला मिळतेय. चाहत्यांनासुध्दा हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून त्यांनीसुध्दा त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

 

मानसीच्या या धम्माल व्हिडीओवर तिचा पती प्रदीपने देखील कमेंट केली आहे. तो म्हणतो, मला हा व्हिडीओ खुप आवडला. पाहून खुपच मजा आली. मानसीचा पती हा आंतरराष्ट्रीय पातळीचा बॉक्सर आहे. तो भारतासाठी अनेक मॅचेस खेळतो.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive