रिंकू राजगुरुने वाढदिवसानिमित्त 300 कुटुंबांना दिले नेब्युलायजर

By  
on  

चाहत्यांना आपल्या प्रेमात सैराट व्हायला लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुचा नुकताच वाढदिवस झाला. यावेळी तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. रिंकू सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. खासकरुन तिच्या विविध लुकमधील व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करते. पण रिंकूने वाढदिवसानिमित्त केलेल्या उपक्रमाचं चाहते कौतुक करत आहेत.

 

रिंकूने महाळूंग परिसरातील 300 कुटुंबांना नेब्युलायजर भेट दिलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांना रिंकूने ही भेट दिली आहे. तिच्या या उपक्रमाचं चाहते कौतुक करत आहेत. लवकरच आठवा रंग प्रेमाचा या आगामी सिनेमात रिंकू झळकणार आहे. याशिवाय छूमंतर या सिनेमाचं चित्रीकरण रिंकूने केलं आहे.

Recommended

Loading...
Share