By  
on  

बबड्याच्या नव्या लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष, पाहा Photo

बबड्या म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या डोक्याला ताप.  रसिक प्रेक्षकांच्या टीकेचा धनी बनलेला बबड्या उर्फ सोहमने म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्कीने अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रचंड गाजवली. वडिलांचं छत्र हरवल्याने आईने भरपूर लाडावलेला सोहम म्हणजेच बबड्या साकारुन आशुतोषने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

बबड्याच्या प्रत्येक करामतींवर सोशल मिडीयावर तर मिम्सचा पाऊस पडायचा आणि घरोघरी फक्त बबड्याचीच चर्चा रंगायची. नकारात्मक भूमिका साकारुनही आशुतोषने रसिकांची मनं जिंकली. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी बबड्याने मात्र आपली छाप सोडलीय. 

अभिनयाप्रमाणेच आशुतोष त्याचा लूककडे आणि फिटनेसकडेही विशेष लक्ष देत असतो. सोशल मिडीयावर आशुतोष सतत सक्रीय असतो. नुकताच आशुतोषने त्याचा  नवा लुक चाहत्यांशी शेअर केला आहे. 

आशुतोषने नुकतंच हेअर कट केल्याचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 'जेव्हा स्वत:चेच केस कापण्याचा प्रयत्न फसतो तेव्हा' असं कॅप्शन देत आशुतोषने हा फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive