मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी गेल्याच महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. दुबईत हे लग्न अगदीच मोजक्या चार-पाच लोकांच्या उपस्थितीत पार पडलं. सध्या कुणाल आणि सोनाली दुबईतच त्यांच्या फ्लॅटमध्ये रहातायत. या लॉकडाऊनच्या काळात बोहल्यावर चढलेली सोनाली पतीसोबत क्वालिटी टाईम एन्जॉय करतेय. पण यातसुध्दा ती पिटनेसला महत्त्व देताना पाहायला मिळतेय. मिळालेला हा मोकळा वेळ फिटनेससाठी सत्कारणी लावलाय. सोशल मिडीयावर ही अप्सरा सतत तिचे फिटने्स गोल्स देणारे व्हिडीओज् आणि फोटोज् चाहत्यांशी शेअर करत असते.
फिटनेसफ्रिक सोनालीने नुकताच एक ्व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण या व्हिडीओत सोनाली एकटीच वर्कआऊट करत नाहीय, तर तिच्यासोबत तिचे पती कुणाल बेनोडेकरसुध्दा तिला ्अप्रतिम साथ देतातयत. सोनालीचं हे पतीसोबतचे फिटनेस गोल्स पाहून चाहत्यांना खुपच आनंद झाला आहे आणि त्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कुणाललासुध्दा वर्कआऊटची आवड आहे हे पहिल्यांदाच ह्या सोनालीने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे समोर आलं. दोघंही घरच्या घरीच ऑनलाईन प्रशिक्षकासमोर वर्काऊट करतायत आणि हे कपल फारच क्युट वाटतंय.
सोनाली सतत तिचे फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते, त्यामुळे चाहत्यांना सोनालीमुळे फिटनेससाठी एक चांगली प्रेरणा मिळतेय किंवा फिटनेसची गोडी लागतेय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.