तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेब फेम अभिनेत्री धनश्री काडगावकरने संपूर्ण महाराष्ट्रात वहिनीसाहेब म्हणून स्थान मिळवलंय. अभिनेत्री धनश्री काडगावकरने जानेवारीत मुलाला जन्म दिला. सोशल मिडियावर धनश्री बाळासोबत अनेकदा फोटो आणि व्हिडियो शेअर करत असते. प्रेग्नन्सी काळातही ती फोटो शेअर करायची. तिच्यावर कौतुकाचा वर्षा्व होत असे.
धनश्रीने आता प्रेग्नन्सीनंतर वाढलेलं वजन मेंटन करण्यासाठी फिटनेसची कास धरलीय. धनश्री नित्यनेमाने वर्कआऊट करतेय आणि तिचे गोल्स गाठण्याचा प्रयत्न करतेय.
धनश्रीच्या वर्कआऊट व्हिडीओजवर आणि फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
काही महिन्यांपूर्वीच धनश्रीचे वाढलेले वजन पाहून तिला अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होताी. पण धनश्री देखील शांत बसली नाही तिने ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. तसंच फॉलो करणा-या चाहत्यांनासुध्दा या व्यक्तीला रिपोर्ट करा असं आवाहन केलं.