By  
on  

मृणाल यांना येते आहे लेक विराजसची आठवण, शेअर केला हा फोटो

मराठी सिनेसृष्टीतील सुपर कुल मायलेकांची जोडी म्हणजे विराजस आणि मृणाल. ही मायलेकांची सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा हे दोघंही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. आताही मृणाल यांनी खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत मृणाल आणि लहानपणीचा विराजस दिसतो आहे. ‘मला या बडबडीची खुप सवय झाली आहे. आठवण येत आहे. भेटू लवकरच.’ 

 

 

मृणाल आणि विराजसची बरेच दिवस भेट झाली नाही. याबाबत पीपिंगमूनच्या एक्सक्लूसिव्ह इंटरव्ह्युमध्ये मृणाल यांनी खुलासा केला होता. मृणाल यांना मध्यंतरी हिमाचलमधून आल्यानंतर करोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं. त्यानंतर विराजस माझा होशील नाच्या शुटसाठी दीवला जावं लागलं. त्यामुळे या मायलेकरांची बरेच दिवस भेट होऊ शकली नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive